Monday, May 08, 2006

मुक्कामपोष्ट ....

नाहीतरी बहुतेक वेळा मी इन्टरनेटशी कनेक्टेड असतोच, तेंव्हा म्हणले हेच आता आपुले मुक्कामपोष्ट !! एक फरक एवढाच की इथे वाचणाऱ्यालाच लिहीणाऱ्याचा पत्ता माहीती असावा लागतो ... एवढेच नव्हे तर त्याला लिहीणाऱ्याच्या मुक्कामपोष्टी जाऊन पत्र वाचावे लागते !!! लोक हल्ली स्वतःच्या मेल-बॉक्स मध्ये आलेली ई-पत्रे देखिल वाचण्याची तसदी घेत नाहीत (निदान उत्तर पाठवण्याची तरी नक्कीच नाही) तर मग एवढा उपद्व्याप करून इथे कोण येणार ?? असो ... लिहून तर बघतो ... बघू कोण येतय पत्ता शोधत ... ह्यातही एक वेगळीच मजा आहे नाही ?? तुम्ही जर एवढे कष्ट उचलून माझ्या मुक्कामी आलाच आहात, तर तुमचाही पत्ता अवश्य सोडून जा ... मी देखिल येऊन जाईन कधीतरी तुमच्या मुक्कामी !!